
जळगाव मिरर | १२ मार्च २०२६
घराबाहेर खाटेवर बसलेल्या दिवलाल सखाराम कोचले (वय २६, रा. बिजापुरी, ता. सेंधवा, जि. बऱ्हाणपुर, मध्यप्रदेश) या तरुणाच्या गळ्यावर चाकू लावून मारहाण केली. त्यानंतर तरुणाच्या खिशातून मोबाईल आणि दोन हजार रुपये जबरीने चोरुन नेले. ही घटना दि. ९ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शिवकॉलनीत घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील दिवलाल कोचले हा तरुण शिवकॉलनी परिसरात बांधकामाच्या ठिकाणी वॉचमन म्हणून कामाल आहे. दि. ९ रोजी रात्रीच्या सुमारास तो भाऊ व काका यांच्यासोबत घराबाहेर खाटेवर बसलेला होता. यावेळी दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने धारदार चाकूचा धाक दाखवून कोचले यांना ओरडू नका नाही तर तुम्हाला मारुन टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर एकाने दिवालाल कोचले याला मारहाण देखील केली.
मारहाण केल्यामुळे मुक्कामार लागलेला दिवलाल याने ओरडण्याचा प्रयत्न केला असता, दुसऱ्या संशयिताने धारदार चाकू त्याच्या गळ्यावर लावून तुमच्या घरात जे सोने आहे ते काढून दे, त्यावर दिवलाल याने आमच्या जवळ सोने नाही असे सांगताच त्या दोघांनी दिवलाल याच्या खिशातील मोबाईल आणि पैसे जबरीने काढून घेतले.
जबरीने पैसे काढल्यानंतर दिवलाल याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. परिसरातील लोक त्यांच्या दिशेने येत असल्याचे बघताच दोघ संशतिय तेथून पसार झाले. त्यांनी दि. १० रोजी रामानंद नगर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक संजय तडवी हे करीत आहे.




















