जळगाव मिरर | ८ फेब्रुवारी २०२४
राज्यातील अनेक शहरात रेल्वेच्या धक्क्याने अनेकांचा जीव जात असताना नुकतेच भंडारा येथील तुमसर रोड मुंडीकोटा येथे रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्याचा धावत्या मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला आहे. मेगा ब्लॉकदरम्यान काम करत असताना ही घटना घडली आहे. अजयकुमार रघुवंशी (वय ५१ वर्ष) असं मृत अभियंत्याचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील तुमसर रोड मुंडीकोटा रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यावेळी तिथे ड्युटीवर असताना अप मार्गाने जाणाऱ्या मालगाडी खाली येऊन तुमसर रोड रेल्वेचे वरिष्ठ रेल्वे अभियंता अजयकुमार यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. अजयकुमार यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.