जळगाव मिरर | ५ डिसेंबर २०२५
राज्यातील महायुती सरकारमधील कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विधानाने मोठे राजकारणात तापणार आहे. भाजपच्या वर्षपूर्ती मेळाव्यातून मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. भाजप देवाभाऊमय तर आहेच. मात्र, महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देखील देवाभाऊच ठरवतात, असे मोठं वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर इतर पक्षातील नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतात याकडे लक्ष असणार आहे.
आज ५ डिसेंबर असून, याच दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानिमित्ताने लोढा यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आगामी काळात महापालिका निवडणुका लागणार असून, भाजपने मुंबई महापालिकासाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने भाजप वाटलाच करीत आहे. मुंबई हे आपलं घर आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकायची असेल तर फक्त अमित साटम किंवा राहुल नार्वेकर यांची जबाबदारी नाही. ती जबाबदारी आपलीही आहे. मुंबईत भाजपचा महापौर बसल्यास आपली कॉलरही टाईट होईल, असेही ते म्हणाले आहेत.




















