
जळगाव मिरर | ११ मार्च २०२६
लग्नाचे आमिष दाखवून एका ३० वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची आणि त्यानंतर बळजबरीने तिचा गर्भपात घडवून आणला. ही धक्कादायक घटना दि. १० मार्च रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एम.आय.डी. सी. पोलीस ठाण्यात संशयित प्रसाद सुरेंद्र खंडेलवाल याच्यासह त्याच्या कुटुंबातील एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला अमरावती येथील एका सरकारी कार्यालयात कार्यरत असून, तिचा परिचय डिसेंबर २०२४ मध्ये एका मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरून संशयित प्रसाद खंडेलवालशी झाला होता. संशयित आरोपीने लग्नाचे आश्वासन देऊन नाशिक आणि जळगाव येथील हॉटेल व मंगल कार्यालयात पीडितेवर तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला ब्लॅकमेल केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०२५ मध्ये एका मंदिरात त्यांचे लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर संशयित आरोपीच्या आई-वडिलांनी आणि बहिणींनी पीडितेचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला.
नोव्हेंबर २०२५ मध्ये पीडिता गर्भवती असताना प्रसाद खंडेलवाल याने तिला बळजबरीने गर्भपाताची गोळी देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. त्यानंतर पुन्हा फेब्रुवारी २०२६ मध्ये पीडिता गर्भवती राहिली असता, आरोपीने तिला स्वीकारण्यास नकार




















