जळगाव मिरर / ९ मार्च २०२३ ।
राज्यात नुकतीच बारावीसह दहावीची परीक्षा अगदी शेवटच्या टप्यात येवून पोहचलेली आहे. याच दिवसात अनेकांनी विचार केला असेल पुढे काय करायचे ? जर तुम्हाला प्रशासकीय सेवेत नोकरी करण्याचा मानस असेल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. दर्जी फाउंडेशन येथे दहावी व बारावीची नुकतीच दिलेल्या किंवा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवी शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण व प्रशासकीय सेवेचा मार्ग यासाठी दहावीनंतर पदवी शिक्षणासोबत ५ वर्षे व बारावीनंतर पदवी शिक्षणासोबत ३ वर्षे अशा यूपीएससी, एमपीएससी फाउंडेशन बॅचेस अर्थात आयसीडीसी बॅचेसचे १ एप्रिलपासून आयोजन करण्यात आले आहे.
१ एप्रिलपर्यंत पालक व विद्यार्थ्यांना प्रा गोपाल दर्जी करीअर समुपदेशन करणार आहे. ज्यांना आपल्या पाल्यांचे करीअर समुपदेशन करुन घ्यावयाचे असेल त्यांनी गणेश कॉलनी रोडवरील दर्जी फाउंडेशन येथे सकाळी ११ ते दुपारी एक व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत संपर्क करावा. तसेच बँक परीक्षा, कम्बाईन परीक्षा, राज्यसेवा इंटिग्रेटेड, पोलिस व सैन्य परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग सुरू आहेत. ज्यांना मार्गदर्शन घ्यायचे आहे. त्यांनी दर्जी फाऊंडेशन येथे संपर्क करावा. तसेच बाहेर गावच्या मुला- मुलींसाठी स्वतंत्र निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे, असे आवाहन संचालिका ज्योती दर्जी यांनी केले आहे.
(वा.वार्ता)
