
जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२५
मेहतर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्रीरामदेवजी बाबांच्या दशमी व सव्वा महिन्याच्या उपवासाची सांगता आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी भक्तिभावाने करण्यात आली. या निमित्ताने गुरुनानक नगर, ममूराबाद रस्ता येथील हनुमान मंदिरात भव्य भंडारा व आरतीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 12 वाजता श्रीरामदेवबाबांच्या आरतीने झाली. ही आरती मा. श्री भैया साहेब शिवचरण जी ढंडोरे, मा. पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर (शनिपेठ पोलीस स्टेशन) तसेच पोलीस कर्मचारी योगेश साळवे यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद (भंडारा) वाटप करण्यात आले. भंडाऱ्यावेळी परिसरात उत्साही वातावरण पाहायला मिळाले. श्रीरामदेवबाबांच्या जयघोषांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमाला प्रेम पवार, कन्हैया जाधव, नंदलाल गोडाले, राजेश चावरिया, राम भैया पवार, पवन जाधव, कुणाल पवार, राहुल पवार, वीनू पवार, अॅड. विशाल रील, शुभम पवार, अजय अटवाल, सोनू चिरावंडे यांच्यासह अनेक समाजबांधव आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या एकतेचा आणि श्रद्धेचा अनोखा संगम या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवायला मिळाला.




















