जळगाव मिरर | २७ मार्च २०२४
जळगाव लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिताताई उदय वाघ यानी नुकतेच जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची त्याच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
या भेटीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी स्मिता ताईना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. विकासाच्या संदर्भात केलेल्या कामाची पावती निश्चितपणे मिळते, त्यामुळे नागरिकांचा उमेदवारावर विश्वास दृढ होत जातो. लोकसभेच्या मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन वेगळे असते, तेथील प्रश्न देखील विविध स्वरूपाचे असतात. या समस्या सोडवन्यावर लक्ष दिले पाहिजे. ग्रामीण भागाच्या विकासाचे चित्र बदलण्याची क्षमता जिल्हा परिषदेत असते, आणि स्मिताताई तुम्ही जिल्हापरिषेद अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केलेले आहे.