जळगाव मिरर | २२ जून २०२४
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दोन्ही गटाकडून उपोषण सुरु आहे तर नुकतेच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलतांना जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले आहेत.
जरांगे पाटील म्हणाले कि, छगन भुजबळ यांनीच मराठा धनगर यांच्यातील वाद पेटवला. त्यांना आता सुट्टी नाही. त्यांचे राजकीय राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही तर नाव बदलेन असे म्हटले आहे. ”छगन भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसीत वाद निर्माण केला. आता मराठा आणि धनगर समाजात वाद निर्माण करत आहे. दोन्ही समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम करत आहे. आम्ही हे कधीच खपवून घेणार नाही, आता छगन भुजबळ यांना सुट्टी नाही”, असा निर्वाणीचा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.
पुढे बोलतांना जरांगे म्हणालेत, ”ओबीसींच्या इतर नेत्यांनी तरी असा जातीयवाद करू नये. भुजबळांना धनगर आणि गरीब मराठ्यात वाद निर्माण करायचा आहे. संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसाला साडेचारशे जाती महत्त्वाच्या की महाराष्ट्र महत्त्वाचा आहे? हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे का? भुजबळांनी दोन पालकमंत्री जवळ ठेवले आहेत. आम्हाला काही फरक पडत नाही. वेळेला आम्ही दाखवून देऊ. छगन भुजबळ विनाकारण मराठ्याच्या विरोधात जात आहे”, असे अनेक आरोप जरांगे यांनी भुजबळांवर केले आहेत.