
जळगाव मिरर । ४ एप्रिल २०२६
जळगाव महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक एकच्या नवनिर्वाचित नगरसेविका रिटाताई विनोद सपकाळे यांचे पती विनोद उर्फ पिंटू सपकाळे यांचे दिनांक 4 एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात उपचार घेत असताना दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, वहिनी, मुल, असा मोठा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी प्रभागात पसरतात नातेवाईकांसह नागरिकांमध्ये शोक व्यक्त होत आहे.
कट्टर सामाजिक कार्यकर्ता हरपला….
गेल्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत पिंटू सपकाळे यांनी अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले होते. व निडणूकित विजय मिळविल्यानंतर त्यांनी प्रभागात कामे देखील सुरु केली होती. नियमित सकाळी प्रभागातील साफ सफाईकडे पिंटूभाऊ सपकाळे यांचे विशेष लक्ष होते. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे खंदे समर्थक म्ह्णून त्यांची ओळख शहरात होती. सध्या ते भाजप पक्षामध्ये प्रवेश घेत रिटाताई सपकाळे यांना विजय मिळवून दिला होता.






















