• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीतील उत्साह विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवावा- रोहिणी खडसे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 11, 2024
in जळगाव ग्रामीण, जळगाव, राजकीय, राज्य
0
कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीतील उत्साह विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवावा- रोहिणी खडसे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ जून २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थापनेला पंचवीस वर्ष पुर्ण झाले. त्यानिमित्ताने पक्षाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. पक्षातर्फे अहिल्यानगर (अहमदनगर) येथे”रौप्य महोत्सवी राष्ट्रवादी” या मुख्य कार्यक्रमाचे पक्षाचे अध्यक्ष खा .शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पक्ष स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले. या पंचवीस वर्षात शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली पक्षाने अनेक चढ उतार बघितले. त्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते साक्षीदार आहात. त्याबद्दल सर्वांचे आणि लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांचे रोहिणी खडसे यांनी अभिनंदन केले.

पुढे संवाद साधताना त्या म्हणाल्या, ही लोकसभा निवडणुक पक्षासाठी अत्यंत महत्वाची होती या निवडणुकीत सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेले नियोजन, घेतलेली जबाबदारी आणि घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर पक्षाला घवघवीत यश मिळून पक्षाचे दहा पैकी आठ खासदार निवडून आले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि आभार. पंचवीस वर्षाच्या काळात अनेक चढउतार सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अनुभवले परंतु या वेळची निवडणूक वेगळी होती. सर्व आपल्या हरण्याची वाट बघत होते परंतु असे म्हणतात जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा प्रत्येक जण तुमच्या हरण्याची वाट बघत असतो आणि आपण जो विजय मिळवला आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि हा तुमच्या प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीने मिळाला आहे. सर्वांचे लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते तेथे सुप्रियाताई या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या. ताईंनी मतदारसंघात केलेले विकास कामे आणि मतदारसंघातील लोकांसोबत असलेला त्यांचा जनसंपर्क यामुळे ताई एक लाख अठ्ठावन हजार मतांच्या भरघोस लिडने निवडून आल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान काही लोकांनी सुप्रियाताईंवर खालच्या स्तरावर जाऊन टिका केली परंतु ताईंनी संयम बाळगला ताईंच्या या संयमाला मी सलाम करते. ताईंसाठी दोन शब्द बोलते,

सब सितम वाले बहोत कमजोर समजे ते जिसे,उसने इस गुलशन मे हंगामा माचाकर रखं दिया
सारे तुफान चुप रहे सारी आंधिया बैठी रही, और एक तितली ने दरखतो को हिला के रख दिया

अशा सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या पुरोगामी विचारसरणीत आम्ही काम करतो याचा अभिमान असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १०६ प्रचार सभा घेतल्या हे सोपे नव्हते शरद पवार साहेबांनी एकेका दिवशी चार ते पाच सभा घेतल्या हे सोपे नव्हते, शरद पवार साहेबांच्या तब्बेतीवर काही लोक टिका करायचे त्यांच्यापेक्षा जास्त प्रचार सभा मेळावे घेऊन साहेबांनी दाखवून दिले वय नाही हिंमत आणि जिद्द लागते त्या जिद्दीच्या जोरावर आपण लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.

लोकसभा निवडणुकीतील हा उत्साह आपल्याला अजून तीन महिने विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवायचा आहे हाच उत्साह घेऊन जे गद्दार आपल्याला सोडून गेले किंवा ज्यांनी गद्दारी केली त्यांना आपल्याला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवून त्यांना जमिनीवर आणायचे आहे महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माता भगिनींनी प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन हि निवडणूक महिलांनी बदलली आणि महिलांनीच या बदलामध्ये सहभाग घेतला आहे त्याबद्दल सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांचे रोहिणी खडसे यांनी अभिनंदन करूनआभार व्यक्त केले.
यावेळी पक्षाच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया ताई सुळे ,प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, माजी मंत्री आ.अनिल देशमुख, आ.राजेश टोपे, आ.जितेंद्र आव्हाड, आ.रोहित पवार, खा.अमोल कोल्हे, खा.निलेश लंके, खा.बजरंग सोनवणे, खा.अमर काळे, खा.धैर्यशील मोहिते, खा.बाळ्यामामा म्हात्रे, खा.भास्कर भगरे आणि पक्षाचे सर्व खासदार , आमदार, सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, नेते , पदाधिकारी , कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Related Posts

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

April 12, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

ऑनलाइन परफ्यूम ऑर्डरच्या नावाखाली १.२१ लाखांची फसवणूक; जळगावातील व्यावसायिकाला गंडा !

April 12, 2026
डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !
जळगाव ग्रामीण

डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

April 12, 2026
बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा
जळगाव

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

April 11, 2026
फुले-आंबेडकर जयंतीचा सामाजिक संदेश: जळगावात मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिलासा !
जळगाव

फुले-आंबेडकर जयंतीचा सामाजिक संदेश: जळगावात मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिलासा !

April 11, 2026
माझे जळगाव, स्वच्छ जळगाव : प्रत्येक प्रभागात नियुक्त होणार ‘स्वच्छता दूत’ !
जळगाव

माझे जळगाव, स्वच्छ जळगाव : प्रत्येक प्रभागात नियुक्त होणार ‘स्वच्छता दूत’ !

April 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

April 12, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

ऑनलाइन परफ्यूम ऑर्डरच्या नावाखाली १.२१ लाखांची फसवणूक; जळगावातील व्यावसायिकाला गंडा !

April 12, 2026
डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

April 12, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

आज लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील, तुम्हाला लवकरच काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

April 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group