जळगाव मिरर | १८ फेब्रुवारी २०२५
जळगाव जिल्ह्यातील अनेक रुग्ण कॅन्सर या आजाराशी लढत असतांना दिसून येत आहे. या आजारावर उपचार घेण्यासाठी जिल्ह्यातील अनेक रुग्ण राज्यातील अनेक मोठ्या शहरात जात असतात. आज देखील जळगाव जिल्ह्यातील कुठ्ल्याशी रुग्णालयात PET SCAN CENTER उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. यावर तत्काळ नियोजन करत जिल्ह्यात देखील हि सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पवन गणेश म्हस्के यांनी मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, जळगाव जिल्ह्यतील कुठल्याही रुग्णालयात PET SCAN CENTER नसल्यामुळे सामान्य नागरीकांना उपचार मिळू शकत नाहीत. सदरचे उपचार संभाजीनगर व नासिक येथेच असल्यामुळे सामान्य नागरीकास त्याचे उपचार आर्थिक रकमेमुळे परवडत नाही. असे यापुढे कोणी सामान्य परिस्थितीतील इसमास घडू नये म्हणून PET SCAN CENTER जळगाव येथे शासकीय योजनेत आपण सुरू केल्यास सामान्य नागरीक आपणास आशिर्वाद देतील यात काच नाही. तरी मंत्री गिरीश महाजन यांनी पुनश्चः विनंती की, आपण PET SCAN CENTER जळगाव येथे शासकीय योजनेत सुरूः रणेचाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी.अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.