जळगाव मिरर | १३ जुलै २०२३
देशातील अनेक तरुणांना आपल्या स्वतंत्र व्यवसाय सुरु करायचा असतो पण अनुभव नसल्याने अनेकांना मोठी निराशा पदरी पडत असते. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत. डेयरी प्रोडक्टची मागणी मार्केटमध्ये वर्षभर असते. दूध, दही, आइसक्रीम असे डेयरी प्रोडक्टचा बिझनेस सुरु करुन तुम्ही लाखोंची कमाई करु शकता. देशातील मोठी डेयरी प्रोडक्ट तयार करणारी कंपनी अमूल लोकांसाठी शानदार संधी घेऊन आली आहे. कंपनी देशभरातील व्यापाऱ्यांना अमूलची फ्रेंचायझी ऑफर करत आहे. अशा वेळी तुम्ही या डेयरी बिझनेसशी जोडले जाऊन चांगली कमाई करु शकता.
तुम्हाला देखील ही फ्रेंचायझी घ्यायची असेल तर याच्या प्रोसेसविषयी आपण जाणून घेणार आहोत. यासोबतच यावर तुम्ही कशी कमाई करु शकता याची माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत. अमूल सोबत व्यवसाय करण्याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला प्रॉफिट शेयरिंगसाठी विचारले जात नाही. अमूल तुम्हाला कमिशनवर वस्तू पुरवते.
किती गुंतवणूक करावी लागेल? सुरुवातीला 2 ते 5 लाख रुपये गुंतवून तुम्ही अमूलची फ्रेंचायझी घेऊ शकता. मात्र, यासाठी तुम्हाला कंपनीने निश्चित केलेल्या काही अटी पूर्ण कराव्या लागतील. उदाहरणार्थ, मुख्य रस्त्यावर किंवा बाजारात तुमचे दुकान असावे. तुम्हाला कोणती फ्रेंचायझी घ्यायची आहे यावर या दुकानाचा आकार अवलंबून असेल. अमूल ऑफर करत असलेल्या 2 प्रकारच्या फ्रँचायझींबद्दल काही गोष्टी खालीलप्रमाणे आहेत. फ्रेंचायझी कशी घ्यावी? अमूल दोन प्रकारच्या फ्रेंचायझी देत आहे. पहिले अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियोस्कची फ्रँचायझी आणि दुसरी अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायझी. तुम्हाला पहिल्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. दुसरीकडे, जर तुम्ही दुसरी फ्रँचायझी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 5 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये 25 ते 50 हजार रुपये नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून द्यावे लागतील.
खर्च किती लागेल? तुम्हाला अमूल आउटलेट उघडायचे असेल तर तुम्हाला नॉन-रिफंडेबल सिक्युरिटी म्हणून 25,000 रुपये द्यावे लागतील. याशिवाय तुमच्याकडून रिनोवेशनसाठी 1 लाख रुपये आणि इक्वीपमेंटसाठी 75 हजार रुपये घेतले जातील. एकूणच, आउटलेट उघडण्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये लागतील. अमूल आइस्क्रीम पार्लरची किंमत जास्त असेल. तुमच्याकडून 50,000 रुपये सिक्योरिटी घेतली जाईल, 4 लाख रुपये रिनोवेशनसाठी आणि 1.50 लाख रुपये इक्वीपमेंटसाठी घेतले जातील.
कमीशन किती मिळतं? अमूल आउटलेट घेतल्यावर, कंपनी अमूल प्रोडक्ट्सच्या मिनिमम सेलिंग प्राइज म्हणजेच एमआरपीवर कमिशन देते. यामध्ये एका मिल्क पाऊचवर 2.5 टक्के, मिल्क प्रोडक्ट्सवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते. अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायझी घेतल्यावर, तुम्हाला रेसिपीवर बेस्ड आइस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50% कमिशन मिळते. त्याच वेळी, कंपनी प्री-पॅक केलेल्या आइस्क्रीमवर 20 टक्के कमिशन आणि अमूल प्रोडक्ट्स र 10 टक्के कमिशन देते.
