
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील प्रताप महाविद्यालयामधील गेल्या काही दिवसापासून जिम बंद असल्याने येथिल ठाकरे गटाच्या युवासेनेने महाविद्यालय प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. यावेळी अमळनेर तालुक़ा युवाअधिकारी विलास पाटील यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयमध्ये विद्यार्थीसाठी शरीर व्याम करीता दिलेली जिम काही दिवसा पासून बंद तरी काही विद्यार्थीने तक्रार करून देखील तरी फ़क्त आश्वासन देन्यात आले. युवासेना अमळनेर शहर व तालुक़ाकड़ून आपल्याला निवेदनद्वारा सूचित करत आहोत की, आपल्या महाविद्यालयतील जिम लवकारत लवकर चालू करने बाबत अन्यथा युवासेनातर्फ़े आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी निवेदनावर अमळनेर तालुक़ा युवाअधिकारी विलास पाटील, शहर युवाअधिकारी अख़्तर तेली, उपशहर युवाधिकारी रोहित पाटील,राहुल ख़ैरनार, युवासैनिक मयूर पाटील व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.




















