
धरणगाव : विनोद रोकडे
गो गं वाजपेयी गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया 17 वर्षाखालील मुलांचा व्हॉलीबॉल संघ विभागीय स्पर्धेत विजयी झाला असून या संघाने कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत धडक मारली आहे
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जिल्हा क्रिडा परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात रंगलेल्या नाशिक विभागीय व्हॉलीबॉल क्रिडा स्पर्धेत नाशिक विरुद्ध रंगलेल्या अंतिम सामन्यात दोन-एक ने पराभव करून हा संघ विजयी झाला आहे. तर १७ वर्षाखालील विद्यालयाचा मुलींचा संघ अंतिम सामन्यात उपविजेता ठरला आहे.
या अजिंक्य स्पर्धेमध्ये १७ वयोगटाखलील १६ संघ तर, १९ वयोगटाखालील १६ संघ अश्या 32 संघांनी सहभाग नोंदवला होता
या संघाला प्रशिक्षक म्हणून आकाश बिवाल लाभले तर क्रीडा शिक्षक डी एन पाटील, व फिलीप गावीत यांनी मार्गदर्शन केले.
17 वर्षा आतील विजयी संघ कुणाल धनगर,खुशाल गोसावी,यशराज जाधव,रोहित बयस, रोहन शिंदे, धनंजय माळी, भुवन महाजन, प्रतिक पाटील , साहिल गजरे, रोहित चिंचोले, पवन देवरे, मयुर पवार हे खेळाडु होते. तर 19 वर्षा आतील मुलींच्या उपविजयी संघात दिक्षा पैठणकर, मिनाक्षी धनगर, नंदनी महाजन, जयश्री भोई, अनन्या पाटील, पूनम पाटील , मिनल भोई, विद्या महाजन, हर्षदा पाटील , साक्षी पाटील, रोशनी जाधव, वैष्णवी पाटील ,लतिका पाटील हे खेळाडूनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले
या शालेय नाशिक विभागीय स्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा, साईक्रीडा मंडळ धरणगाव व व्हॉलीबॉल असोसिएशन जळगाव जिल्हा सर्व व्हॉलीबॉल प्रेमी सिनियर व ज्युनिअर खेळाडू यांच्या आयोजनातून संपन्न झाला.महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे स्कुटीनी कमिटीचे अध्यक्ष रविंद्र कंखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंच म्हणून गौरव भागवत, जयेश मासरे, अनिकेत सोनवणे,ईश्वर चौधरी,रुपेश चौधरी, वैभव भोलाने, सोनल मनोरे,ललित डोके,आकाश धनगर,अतुल पाटील,गणेश कंखरे,, यांनी काम पाहिले
या संघाने इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा शिरपेचात पुन्हा एकदा मनाचा तुरा रोवला असून
या यशाबद्दल विद्यालयाचे चेअरमन डी जी पाटील,सचिव सी के पाटील,संचालक अश्विन पाटील,संचालक मच्छिंद्र पाटील,भरत पाटील मुख्याध्यापिका सौ सुरेखा पाटील,पर्यवेक्षक ए एस पाटील व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे
स्पर्धेतील विजयी संघ
१) 17, वर्षा खालील विजयी संघ ( मुले) इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय धरणगांव जिल्हा -जळगांव
२) 17वर्षा खालील विजयी संघ( मुली)बॉईज टाऊन पब्लिक स्कूल नाशिक म.न.पा.
१) 19 मालेगाव हायस्कुल ऍन्ड ज्युनियर कॉलेज , मालेगाव
२) 19 वर्षा खालील विजयी संघ( मुली) डा.दे.बिटको हायस्कुल व ज्युनियर कॉलेज नाशिक म.न.पा.




















