अमळनेर : विक्की उत्तम जाधव
मैत्रेय प्रकरण तारांकित प्रश्न मांडण्यासाठी नामदार अनिल पाटील यांना मैत्रेय ठेविदार यांचा कडून निवेदन देण्यात आले.
दि.29/10/2023 रोजी अमळनेर येथे त्यांच्या निवासस्थानी मैत्रेय ठेवीदार आणि नामदार अनिल पाटील यांच्यामधील मैत्रेय प्रकरणाविषयी सखोल चौकशी करण्यात आली सदर मैत्रेय प्रकरण हे चौकशीच्या आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये गेल्या सहा वर्षांपासून खितपत पडून असून सदर प्रकरणाला गती प्राप्त करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे मंत्रिमहोदयांनी सांगितले.
सदर प्रकरणाची मला माहिती असून चार वर्षांपूर्वी हे प्रकरण मी पाचोराच्या आमदार किशोर पाटील यांच्यासोबत विधानसभेत लक्षवेधी मांडली आहे मैत्रेय मध्ये माझे नातेवाईक जवळचे मित्र सहकारी यांचाही पैसा अडकलेला आहे .सदर प्रकरणाबाबत गृहमंत्र्यांबरोबर बैठक लावून मी प्रयत्नशील राहील असे आश्वासन नामदार अनिलजी पाटील यांनी मैत्रेय ठेविदार यांना दिले .निवेदन देतांना डी .बी.पाटील ,रमेश पाटील ,योगेश पाटील ,नानासाहेब पाटील, पिंटू दर्डा ,राजेंद्र देवरे, सुभाष पाटील ,सुरेश खैरनार , गुलाबराव पाटील, पुष्पा पाटील, शोभा पाटील ,लिलाबाई पाटील व असंख्य ठेवीदार व पिंटू दर्डा व टीम उपस्थित होते.