
जळगाव मिरर / ४ नोव्हेंबर २०२२
४ नोव्हेंबर २०२२ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाचे अध्यक्ष यांना निवेदन देऊन विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की ४ नोव्हेंबर २०२२ रोजी अनु .जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष यांची अजिंठा विश्रामगृहावर कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष व त्यांच्या शिष्टमंडळांनी भेटी दरम्यान जळगाव जिल्ह्यातील शासकीय नियम शासकीय विभागात आरक्षण अधिनियम २००१ व शासनाचे निर्देश असूनही मागासवर्गीय कक्ष स्थापन करण्यात आला नाही तसेच प्रत्येक कार्यालयाने रिक्त पदांचा तपशील फलकावर लावला नाही तसेच सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्ष नाशिक यांच्याकडून दरवर्षी बिंदू आणि नामावली प्रमाणित करून घेणे गरजेचे असताना बिंदू नामावली प्रमाणीत केली नसल्याने रिक्त पदे तसेच पदोन्नतीतील पदे भरण्यात अडचणी येत असल्याने बरसा कर्मचारी पदोन्नती पासून वंचित आहे कास्ट्राईब महासंघाने अनेक कार्यालयात पत्र देऊ नये त्याची दखल घेत नाही या बाबीचा विचार करून संबंधित यंत्रणेला उचित आदेश देणे बाबत निवेदनात म्हटले आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नसल्याने गरीब अनु . जाती जमाती वगीचे विद्यार्थ्यांची कोंडी होत असल्याचे आयोगाच्या निदर्शनाने देण्यात आले .याप्रसंगी आयोगाचे अध्यक्ष माननीय अभ्यंकर साहेब तसेच आयोगाचे सदस्य माननीय किशोर मेंढे साहेब यांचा फुल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी कास्ट्राईब मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र तायडे , ब्रह्मानंद तायडे . कास्ट्राईब जिल्हा सचिव ,बापू साळुंखे कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष, योगेश अडकमोल सहसचिव कास्ट्राईब महासंघ ,सुरेश भालेराव कास्ट्राईब महानगर पालिका, अनुपम मेढे अतिराज्य सरचिटणीस कास्ट्राईब भुमि अभिलेख, प्रा. लोंढे सर ,कास्ट्राईब शिक्षक संघटनचे भुसावळ तालुकाध्यक्ष समाधान जाधव इ. उपस्थित होते .





















