जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२४
शहरातील हरीविठ्ठल नगरातील धनगरवाडा येथे बंद घर फोडून घरातून सहा हजार रुपये किमतीचे भांडे व इतर साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवार दि. २४ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला. दरम्यान पोलिसांनी संशयित ऋषिकेश उर्फ बंटी मिस्तरी (रा.हरिविठ्ठलनगर) याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हरिविठ्ठल नगरात लक्ष्मी लोकेश गोपाळ (वय २२) या महिला वास्तव्याला आहे. मंगळवार दि. २४ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास संशयित ऋषिकेश उर्फ बंटी मिस्तरी याने महिलेच्या त्यांच्या घराच्या मागचा पत्रा तोडून आत प्रवेश केला. त्याने घरातून सहा हजार रुपये किमतीची भांडी आणि इतर साहित्य चोरून नेले. या घटनेबाबत महिने रात्री रामानंद नगर पोलिसांना तक्रार दिली. त्यानुसार संशयित ऋषिकेश उर्फ बंटी मिस्तरी त्याच्या विरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रेवानंद साळुंखे हे करीत आहे.