चाळीसगाव : कल्पेश महाले
चाळीसगाव शहरातील तहसील कार्यालय आवारातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संघटना यांनी आपल्या नऊ ते दहा मागण्यांसाठी चाळीसगावात एका दिवसाचं धरणे आंदोलन करून मागण्या मान्य करण्याची मागणी दुय्यम निंबधक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे कि, मुद्रांक विक्रीचे कमिशन तीन टक्के ऐवजी दहा टक्के करून मिळावे, मुद्रांक विक्रीची मर्यादा दहा हजार रुपये वरून एक लाख रुपये पर्यंत मिळावी, स्टॅम्प विक्री करताना मदतनिस ठेवण्यास परवानगी मिळावी, १०० व ५०० रुपयाचे स्टॅम्प पेपर बंद करू नये, वारसांना परवाने हस्तांतरित करून मिळावे, मुद्रांक विक्री धोरणात बदल केल्यास अथवा ट्रेकिंग मशीन द्वारे विक्री करणार असल्यास ते वेडर्स मार्फत केली गेली पाहिजे, एक हजार रुपये वरील छापलेल्या मुद्रांक विक्रीस परवानगी मिळावी, शासनाने मुद्रांकाची छपाई बंद केली आहे ती त्वरित सुरू करावी, नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये आम्हाला बसण्यासाठी जागा मिळावी, अशा मागण्यांसाठी चाळीसगाव तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
या निवेदनावर राजेंद्र रामचंद्र पिंपळे,पराग पुरुषोत्तम कुलकर्णी, रमेश शिवदास निकम, सोमनाथ कौतिक पाटील, नागेश आवटे, भिमराव नारायण जाधव, संजय नथ्थू सोनार, संजय अवधुत कुलकर्णी, सिध्दार्थ रामदास मोरे, बापूराव अनंतराव देवकर, विलास हिरामण पाटील, श्रीमती सविता अशोक देशमुख, श्री दिलीप रामचंद्र पांगारे, श्री शरद दिनकर साखरे यांची स्वाक्षरी आहेत.