• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

जिद्दीने मिळवली नोकरी पण अडीचवर्षानंतर अपघातात युवक ठार

धरणगाव पंचायत समिती गृहनिर्माण विभागात होता कार्यरत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 6, 2022
in Uncategorized
0
जिद्दीने मिळवली नोकरी पण अडीचवर्षानंतर अपघातात युवक ठार
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव : प्रतिनिधी

वडिलांच्या मेहनतीने व स्वतःच्या जिद्दीने शिक्षण करून अभियंता पदावर पोहचलेला २५ वर्षीय तरुण धरणगाव पंचायत समिती गृहनिर्माण म्हणून कार्यरत असलेले शुभम संजय सोनवणे (वय,२५ रा. अमळनेर) यांचा शुक्रवारी सायंकाळी म्हसले गावाजवळ अपघाती मृत्यू झाला आहे.

स्वतःच्या घराचे स्वप्न रंगविणारा शुभम सोनवणे हा तरुण धरणगाव पंचायत समितीत ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून २०१९ पासून काम करत होता. मानधन तत्वावर कार्यरत असल्यामुळे शासकीय सवलती नव्हत्या. शुभम नेहमी प्रमाणे कार्यालयीन काम आपटून शुक्रवारी (दि.५ ऑगस्ट) अमळनेर आपल्या घरी जात होता. परंतू रात्री साधारण ८ वाजेच्या सुमारास म्हसले ते टाकरखेडा दरम्यान पाऊस सुरू झाला. या पावसामुळे शुभमची दुचाकी स्लीप झाली. त्यात शुभमच्या डोक्याला जबर मार लागला. त्यात त्याचे जागीच निधन झाले. लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारा शुभम अखेरच्या प्रवासात स्वतःच्या घरी पोहचू शकला नाही. शुभमच्या पश्चात आई – वडील, भाऊ – बहिण असा परिवार आहे. घरातली सर्व जबाबदारी शुभमवरच होती. परिवाराची परिस्थिती बिकट असल्याने शासनाकडून काही आर्थिक मदत मिळाली तर बरं होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वडील ज्या रस्त्यावर चालवायचे कालीपिली त्याच रस्त्यावर शुभमचा अपघात
वडिलांनी मोठ्या कष्टाने शुभमला उच्च शिक्षित केले होते. कठीण परिस्थिती असूनही शुभमने शिक्षणाची जिद्द सोडली नव्हती. नुकतेच त्याने बी.टेक. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यामुळे शुभम नेहमी मित्र दिनेश भदाणे (धरणगाव) यांच्यासह कार्यालयीन सहकाऱ्यांना त्याच्यावर असलेल्या पारिवारिक जबाबदारी बाबत बोलायचा. लहान-भाऊ बहिणीचे शिक्षण करायचे आहे. स्वतःचे घर बनवायचे आहे. माझे स्वप्न पूर्ण होईल, तेव्हा होईल. परंतू लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात माझा हातभार लागतोय, यातच मला मोठा आनंद असल्याची भावना शुभम नेहमी व्यक्त करायचा. खऱ्या अर्थाने हा शुभमचा नव्हे तर नियतीने स्वप्नांचा केलेला अपघात असल्याचे म्हटले चुकीचे ठरणार नाही. कारण शुभमचे वडील ज्या अमळनेर-धरणगाव मार्गावर कालीपिली चालवतात त्याच रस्त्यावर त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न कायमचे पुसले गेलेले.

Related Posts

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
Uncategorized

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 11, 2026
उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !
Uncategorized

उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

April 10, 2026
जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !
Uncategorized

जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !

April 8, 2026
मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!
Uncategorized

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

April 7, 2026
खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !
Uncategorized

खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !

April 6, 2026
कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !
Uncategorized

कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !

April 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

April 13, 2026
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026
मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

April 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group