जळगाव मिरर | १६ मार्च २०२५
शाळेला सुट्टी असल्याने शाळेच्या गेटवरुन आत प्रवेश केला. त्यानंतर छोट्याश्या गॅप मधून वर्गामधील सहा सिलींग फॅनसह सीसीटीव्ही कॅमेरे व ३०० मिटर केबल चोरुन नेत असतांना विद्यार्थ्याला शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना दि. १४ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिवाजी नगरातील खुचंद सागरमल विद्यालयात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवाजी नगरातील खुचंद सागरमल विद्यालयात निखील लक्ष्मण जोगी हे मुख्याध्यापक आहे. दि. १४ रोजी धुलीवंदन असल्याने शाळेला सुट्टी होती. यावेळी त्यांना दुपारच्या सुमारास शाळेजवळून जात असलेल्यांनी शाळेतून काहीतरी ठोकण्याचा आवाज येत असल्याचे सांगितले. त्यानुसार मुख्याध्यापक हे इतर शिक्षकांना घेवून लागलीच शाळेजवळ आले. त्यांनी शाळेचे गेटचे कुलूप उघडून जात असतांना त्यांना एक मुलगा एका वर्गाजवळील दरवाजाजवळ उभा असलेला दिसून आला. त्यावेळी त्याला तू कोण असून याठिकाणी काय करत आहे अशी विचारा केली असता, तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि तो एका वर्गात लपून बसला होता. शिक्षकांनी घटनेची माहिती लागलीच त्या परिसरात गस्तीवर असलेल्या गुन्हे शोध पथकातील वसीम मलिक यांना दिली. त्यांनी लागलीच शाळेकडे धाव घेतली.
दरम्यान, शिक्षक पोलिसांसोबत तो मुलगा असलेल्या वर्गात गेले असता, त्या वर्गातील सिलींग फॅन अगोदरच काढून ठेवला असल्याचे त्यांना दिसले. तसेच हा मुलगा याच शाळेत शिक्षण घेत असल्याचे देखील पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
त्या मुलाला घेवून पोलीस कर्मचारी वसीम मलिक हे पोलीस ठाण्यात आणले, यावेळी त्याची विचारपूस केल्यानंतर दोन महिन्यांपुर्वी शाळेतून पाच सिलींग फॅन व चार सीसीटीव्ही कॅमेरे व ३०० मिटर वायरची देखील चोरी झाली होती. ही चोरी देखील याच अल्पवयीन मुलाने केल्याचे उघड झाले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















