अमळनेर : विक्की जाधव
शहरातील ताडेपुरा धरणगाव रोडवर अनेक महिन्यांपासून गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागात करण्यात आली होती, कारण ताडेपुरा भागात अत्यंत दाट वस्ती असल्याकारणामुळे तसेच धरणगाव-जळगावकडे जाणारे राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणावर गाड्यांची ये-जा सुरू असल्यामुळे तसेच अति वेगाने गाड्या चालत असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात होणे दैनंदिनचे नित्यक्रम झाले होते. अनेक वेळा परिसरातील नागरिकांकडून तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय संदानशिव, प्रविण बैसाणे, रमेश शिरसाठ, बाळासाहेब सोनवणे, चंद्रकांत कंखरे आदींनी संबंधित विभागाला अनेक अर्ज केले होते. या सर्व गोष्टींचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागात मार्फत ताडेपुरा धरणगाव रोडवर एकूण 4 ठिकाणी तसेच आदिवासी आश्रम शाळेजवळ १ गतिरोधक बसवण्यात आले आहे.
परिसरात गतिरोधक बसवल्यामुळे नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वारुळे, शाखा अभियंता संकेत चौधरी, श्रीकांत चिखलोतकर इत्यादींचे आभार मानण्यात आले होते. त्या ठिकाणी आत्माराम अहिरे, शरद धनगर,किरण बहारे,सारंग संदानशिव, विकी वानखेडे, इत्यादी नागरिक उपस्थित होते.




















