जळगाव मिरर | २४ फेब्रुवारी २०२५
देशात गेल्या काही वर्षापासून बागेश्वर धाम सरकार मोठ्या चर्चेत असतांना आता मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील बागेश्वर धाम येथे बालाजी कँसर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरचे डिजिटल भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लक्ष करत चांगलाच समाचार घेतला आहे. याप्रसंगी बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्रशास्त्रीही उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, ‘धार्मिक परंपरांची खिल्ली उडवणारे लोक समाजात फूट पाडण्याचे काम करतात, असे लोक गुलामगिरी प्रवृत्तीची असतात,’ आजकाल काही नेते धर्माची खिल्ली उडवतात. त्यास कमी लेखतात. लोकांत फूट पाडण्याचे काम करतात. अनेकदा परदेशी शक्तीदेखील अशा लोकांचे समर्थन करते. यातून देश व धर्माला कमकुवत करण्याचा प्रयत्न असतो. हिंदूंच्या श्रद्धेचा तिरस्कार करणारे लोक अनेक शतकांपासून कोणत्या ना कोणत्या रूपात राहिले आहेत.
आयुष्मानसाठी पैसे मागितल्यास मला पत्राने कळवा … मोदी म्हणाले, प्रत्येक गरिबाची मोफत उपचाराची सोय केली आहे. त्यासाठी आयुष्मान कार्ड बनवले आहे. हे कार्ड आॅनलाइन तयार होईल. त्यासाठी कुठेही पैसे देण्याची गरज नाही. परंतु कुणी पैसे मागितल्यास मला पत्राने कळवा. बाकीचे काम मी करून घेईल.
रुग्णालयाच्या भूमिपूजनाआधी मोदींनी बागेश्वर धामचे पं. धीरेंद्रशास्त्री यांच्या माता सरोजदेवींची भेट घेतली. मी चिठ्ठी काढली तर तुमच्या मनात मुलाचा विवाह व्हावा, अशी इच्छा असेल ना, असे मोदींनी त्यांना विचारले. त्यावर सरोज म्हणाल्या, होय. आता इच्छा तर अशीच आहे. मोदी म्हणाले, या वेळी बालाजींचे बोलावणे आले. ही हनुमंताची कृपा आहे. हे श्रद्धेचे धाम आता आरोग्य केंद्र बनले. १० एकरमध्ये हे केंद्र आहे. यात १०० खाटांची सुविधा असेल.