
जळगाव मिरर | ६ मे २०२५
जामनेर तालुक्यातील पहूरकडून जामनेरकडे जाणारा साखरेच्या ट्रक सोनाळा फाट्याजवळ उलटल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पहूर पोलिसांच्या सहकार्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, पहूर ते जामनेर मार्गावर सोनाळा फाट्याजवळील वळणावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. साखरेची वाहतूक करणारा ट्रक (एमपी- ०९, एचजे ०४४६) उलटला सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. परंतु, महामार्गावरच ट्रक उलटल्याने वाहतूक मात्र ठप्प झाली होती. पहूर वाहतूक पोलिसांच्या मदतीने ही रहदारी पूर्ववत करण्यात आली. दरम्यान किरकोळ जखमी झालेल्या चालक व अन्य एकाला प्रथमोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांत उशिरापर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.




















