जळगाव मिरर | ५ मार्च २०२४
एरंडोल तालुक्यातील मालखेडा येथील प्रगतीशील शेतकरी सुनील गंगाराम पाटील यांना नुकताच सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सन 2022-23 या वर्षासाठी एरंडोल तालुक्यातील सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने मालखेडा गावाचे प्रगतिशील शेतकरी व जैविक शेतीचे प्रणेते सुनील गंगाराम पाटील यांना आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याबद्दल सुनील पाटील यांचे कृषी अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.