• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सर्वोच्च न्यायालयाने दिली जिंतेद्र आव्हाड यांना नोटीस

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 22, 2022
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
सर्वोच्च न्यायालयाने दिली जिंतेद्र आव्हाड यांना नोटीस
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २२ ऑक्टोबर २०२२

राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जिंतेद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यांचे अपहरण आणि मारहाण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली असून आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.

अपरहण व मारहाणप्रकरणी अनंत करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, राज्य सरकारने सीबीआयला महाराष्ट्रामध्ये पुन्हा थेट चौकशीचे अधिकार बहाल केले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ठाण्यातील घोडबंदर येथील राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी 2020 मध्ये तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते संतापले होते. कार्यकर्त्यांनी करमुसे यांना थेट जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्यासमोरच कार्यकर्ते व जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी आपल्याला बेदम मारहाण केली, असा आरोप करमुसे यांनी केला होता.

माराहाणीनंतर करमुसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. करमुसे यांच्या तक्रारीवरून आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटकही केली होती. याप्रकरणी ठाणे न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, ठाणे न्यायालयाने कार्यकर्त्यांना याप्रकरणी जामीन मंजूर केला होता. करमुसे यांनी या प्रकरणी आता थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका दाखल करून घेतली आहे. याचिकेत ठाणे शहर पोलिस आव्हाड यांच्याशी हातमिळवणी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर उत्तर देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आव्हाड यांना दिले आहे. या प्रकरणी 25 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने राज्यात सीबीआयला चौकशीसाठी पुन्हा थेट अधिकार देण्यात आले आहेत. 21 ऑक्टोबर 2021 रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सीबीआयला राज्यात तपास करण्यासाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता असल्याचा निर्णय घेतला होता. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रातील सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन सीबीआयला राज्यात थेट चौकशीची परवानगी नाकारण्यात आली होती. शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर सीबीआयला महाराष्ट्रात चौकशी करण्यासाठी आवश्यक असणारी ‘जनरल कन्सेंट’ पुन्हा देण्यात आली आहे. तसेच, करमुसे यांनीही मारहाण व अपहरण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही केली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या मागेही सीबीआयचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर
जळगाव

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !
क्राईम

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group