अमळनेर मिरर प्रतिनिधी
येथील अंबऋषी टेकडीवर अनेक वृक्षप्रेमींनी झाडे लावली आहेत. यात मोठे योगदान असणारे वाडी चौकातील रहिवासी सुरेश हिरालाल भावसार यांना वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे वृक्षमित्र पुरस्कार प्रदान झाल्याने टेकडी गुपतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
अंबऋषी टेकडी आता जंगलच वाटू लागली असून हे सर्व करण्यात टेकडी ग्रुपची मेहनत आहे. झाडे लावणे सोपी गोष्ट असून झाडे जगवणे हे खूपच कठीण कार्य आहे. आणि तेच कार्य अंबऋषी टेकडी ग्रुप करत आहे. रोजच्या रोज झाडांना पाणी देणे झाडांची निगा राखणे या कामात सुरेश भावसार यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. यासाठी त्यांना वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान अमळनेर तर्फे ‘वृक्षमित्र’. पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. टेकडी गुपचे डॉ. अनिल वाणी, नरेश कांबळे, आबा भदाणे, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी,पक्षीमित्र सुनील भोई, मंगळ ग्रह संस्थेचे बाविस्कर सर, डॉ. राजेंद्र सोनार, योगेश येवले, आशिष चौधरी, श्याम पुरकर, लोटन पाटील, हेमंत पाठक, गौरव चौधरी, राजेंद्र चौधरी आदींनी भावसार यांचे अभिनंदन केले.