अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर तालुक्यातील इंडिया आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू असताना दोन तरुण संसदेत प्रवेश करुन स्मोक हल्ला केला या घटनेबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत सविस्तर निवेदन केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत सादर करावे अशी मागणी करणाऱ्या दोन्ही सभागृहातील एकूण १४२ खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले ही एकप्रकारे लोकशाही तत्वाची नग्न हत्या आहे.
तसेच लोकशाहीच्या या अपमाना विरोधात इंडिया आघाडी तर्फे विरोध व निषेध करुन भाजप सरकारचा धिक्कार करत आहोत. तसेच लोकशाही ही शेवटची घटीका मोजत आहे असे केंद्र सरकारच्या धोरणावरून लक्षात येत आहे. पण जनता यांना येत्या काळात धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. यात काही शंका नाही. तसेच निलंबन केलेल्या खासदारांचे निलंबन हे तात्काळ माघे घेण्यात यावे असे आपणास या निवेदनाव्दारे ईशारा देत आहोत. निलंबन माघे न झाल्यास या विरोधात तीव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिला यावेळी माजी आमदार डॉ बी एस पाटील, सुलोचना वाघ, गोकुळ बोरसे, रा काँ तालुकाध्यक्ष सचिन पाटील, तिलोत्तमा पाटील, भागवत सूर्यवंशी, उमेश पाटील, विजय पाटील, अरुण शिंदे, हर्षल जाधव, सचिन वाघ, रज्जाक तेली, डी एम पाटील, तौसिफ तेली, तुषार संदानशिव आदी उपस्थित होते.