जळगाव मिरर | २१ मार्च २०२४
शहरातील गेंदालाल मिल परिसरात दि. १९ मार्च पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोन महिलांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या पतीचे त्याच परिसरातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय सदर पतीच्या पत्नीला असल्याने तिने व तिच्या मुलीने महिलेला मारहाण केली. त्या वेळी शेजारील एक महिला तेथे भांडण सोडवण्यासाठी आली असता तिलादेखील मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोघींविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. या सोबतच संबंधित पतीच्या पत्नीनेदेखील शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे




















