• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 15, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ मार्च २०२६ 

एकत्रित आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय येथे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रोहनजी घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

याप्रसंगी समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे यांनी आयुष्यमान भारत योजना घेतलेल्या रुग्णालयांनी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. नागरिकांनाही आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपले आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचा रहिवासी हा आपल्या योजनेत उपचार घेण्यासाठी पात्र आहे. पांढरी , केशरी व पिवळी यापैकी त्याची कोणतीही शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. तसेच आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी कुटबाची ऑनलाईन शिधापत्रिका (डिजिटल) करून घ्यावी, तसेच त्यात नवीन सदस्य असतील तर त्यांचे नवे समाविष्ट करून अपडेट करून घ्यावे. कारण एकत्रित कुटुंबाची माहिती यात असल्याने मोबाईल नंबर लिंकिंग आधार कार्डही योजना प्रणालीशी जोडणे गरजेचे असल्याचे सांगितले.
तर जे रुग्णालय योजना घेऊन काम करीत नाही किंवा ज्यांनी काम अद्याप सुरू केले नाही अशा रुग्णालयांनी एक महिन्यात काम सुरू करावे अन्यथा कठोर कार्यवाही करण्यात आदेश देण्यात आले.

व्याधीग्रस्त गंभीर रुग्णांना रुग्णालयात गेल्यानंतर योजनेत लाभ घेताना त्रास होऊ नये याकरिता सर्व नागरिकांनी आपले आयुष्यमान कार्ड काढून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीत जिल्ह्यातील रुग्णालयांचा संलग्नीकरण, रुग्णालयांचा योजनेच्या काम ,आयुष्यमान कर्ड केवायसी, आयुष्यमान भारत वय वंदना योजना याचा आढावा घेण्यात आला.

जिल्हा समन्वयक डॉ.सुमित जैन यांनी आशा सेविका, रेशन दुकानदार , सीएससी केंद्र तसेच रुग्णालयात असणार आरोग्य मित्र आदी जवळपास सहा हजार लोकांची टीम जिल्ह्यात सेवारत असल्याचे सांगिले . यापैकी कुणाकडेही गेल्यानंतर ते आपले आयुष्यांनान कार्ड काढून देतील असेही नमूद केले. याचबरोबर आयुष्यमान अप डाउनलोड करून सामान्य नागरिक स्वतः आपले आयुष्यमान कार्ड काढू शकतात याचीही माहिती दिली.याच बरोबर शून्य ते सत्तर वर्षापर्यंत या योजनेत कसा लाभ मिळू शकतो याबाबत माहिती देऊन शहर,तालुका तसेच जिल्हा स्तरावर रुग्णालयांची माहिती दिली.

योजनेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी सेवाभावी डॉक्टरांतर्फे तसेच सोशल मिडिया द्वारे जनजागृती करावी असे आवाहन डॉ. भरत बोरावले यांनी केले,. जेष्ठ नागरिक यांनी आयुष्यमान भारत वय वंदना कार्ड काढून यात यात स्वयस्फूर्त सहभागी व्हावे असे आवाहन अरुण माळी यांनी केले .

अस्थिरोग शस्त्रक्रिये करिता योजनेत समाविष्ट रुग्णालयांना काही अडचणी किंवा त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी आरोग्य मित्र व त्या रुग्णालय प्रमुखांची कार्यशाळा घेऊन रुग्णहितासाठी कार्य करण्याचे आवाहन सदस्य मुकुंद गोसावी यांनी करून सामाजिक संस्था व नागरिकांनीही स्वयंभु पुढे येऊन आरोग्य योजनेचे कार्ड जोडण्याकरिता आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी समितीचे जिल्हा सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.स्वप्नील सांगळे ,जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा समन्वयक( राज्य आरोग्य हमी सोसायटीचे)डॉ.सुमित जैन ,आयएमएचे डॉ. भरत बोरोले,
समिती अशासकीय सदस्य मुकुंद गोसावी ,ज्येष्ठ नागरिक संघ प्रतिनिधी अरुण देवराम माळी तसेच अंमलबजावणी सहाय्य संस्थेचे विभागीय प्रमुख डॉ. सुनिल राजपूत, जिल्हा प्रमुख डॉ. अनुराधा वाडीले, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ कुणाल फेगडे, जिल्हा पर्यवेक्षक निलेश चौधरी, आरोग्यमित्र सुनील परखड, सागर राणे, दानिश शेख आदी उपस्थित होते.

Related Posts

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !
जळगाव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !

March 15, 2026
कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी
जळगाव ग्रामीण

कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

March 15, 2026
राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा; दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकाचवेळी मिळणार
राजकीय

राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा; दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकाचवेळी मिळणार

March 15, 2026
जळगावात दुपारच्या सुमारास गोळीबार करणार संशयित पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

जळगावात दुपारच्या सुमारास गोळीबार करणार संशयित पोलिसांच्या ताब्यात !

March 15, 2026
प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; बेपत्ता प्रकरणाचा उलगडा, पती-पत्नी अटकेत !
क्राईम

प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; बेपत्ता प्रकरणाचा उलगडा, पती-पत्नी अटकेत !

March 15, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

ट्रॅक्टर-ट्रॉलीचा भीषण अपघात : अँगल तुटल्याने ट्रॉली उलटली; वृद्ध कामगार ठार, तिघे जखमी !

March 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !

March 15, 2026
कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

March 15, 2026
राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा; दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकाचवेळी मिळणार

राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा; दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकाचवेळी मिळणार

March 15, 2026
आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन

आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन

March 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group