
प्रत्येक वेळी प्रेमात तरुणच पडतो असे नाही कधी कधी तरुणी देखील तरुणाच्या प्रेमात पडत असतात या प्रेमाला वय असावे लागते असे देखील नाही म्हणूनच प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. पण प्रेम काही नैतिकता व कायदेशीर गोष्टी पासून पुढे जाते तेव्हा त्या प्रेमावर आक्षेप देखील येत असतो. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेश राज्यातील कानपुर शहरात घडली आहे. चक्क शिक्षिका एका १० विच्या विद्यार्थ्यांच्या प्रेमात पडली असल्याने मुलाच्या पित्याने आता पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्याने शिक्षिकेच्या अडचणीत वाढ झाली आहे.
शिक्षिका विद्यार्थ्यासोबत अश्लील चॅटिंग करत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. मुलाच्या वडिलांनी सध्या सहाय्यक अधीक्षकांकडे तक्रार केल्यांनतर संबंधित पोलीस स्थानकात या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर शहरातील कैंट पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या शाळेतील हा प्रकार असून उन्नावमधील एका व्यक्तीने एएसपी बृज नारायण सिंह यांना पत्र पाठवून याबाबत तक्रार केली आहे. या पात्रात असं म्हटलंय की, त्याचा मुलगा १० वी मध्ये शिकत आहे. मात्र, त्याच्या शाळेतील एक शिक्षिका त्याच्यासोबत रात्र-रात्रभर मोबाईलवर चॅटिंग करत असते. तसेच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत आहे. दरम्यान या व्यक्तीने आपल्या मुलाचे आणि शिक्षिकेच्या चॅटिंगचे स्क्रीन शॉट सुद्धा पाठवले आहेत.
याबाबत एसीपी म्हणाले, संबंधित व्यक्तीने आपल्या मुलाचे आणि शिक्षिकेच्या बोलण्याचे पुरावे दिले आहेत. मुलाने चॅटिंग डिलीट केल्याचं कारण देखील देण्यात आले आहे. या दरम्यान कैंट पोलीस स्थानकाला या प्रकरणी तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शारीरिक संबंध करण्यासाठी दबावाबाबत तपास सुरू आहे. जी माहिती समोर येईल त्यावर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.