
जळगाव मिरर | १ मार्च २०२५
गेल्या अनेक महिन्यापासून जिल्ह्यातील काही ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच शहरापासून जवळ असलेल्या ममुराबादनजीक विटांनी भरलेल्या डंपरने दुचाकी ला धडक दिल्याने दुचाकी वरील मास्टर कॉलनी येथील राहणारा विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी दहा वाजता घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मास्टर कॉलनी रहिवासी फैसल मुस्ताक पटेल (वय २०) असे मयत तरुणाचे नाव असून, त्याचा मित्र वासीक खान युसुफ खान (वय २०) हा गंभीर जखमी झाला आहे. फैसल आणि वासीक हे दोघे दुचाकीने जळगावहून महाविद्यालयाकडे जात होते. ममुराबाद रस्त्यावर समोरून येणाऱ्या विटांनी भरलेल्या मालवाहू वाहन (क्रमांक एमएच १३ एएन ४४४५) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात फैसलचा जागीच मृत्यू झाला, तर वासीक गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच फैसलचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. फैसल हा घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मास्टर कॉलनी परिसरात. हळहळ व्यक्त होत आहे.या या अपघाताबाबत पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.