
जळगाव मिरर / २६ डिसेंबर २०२२
जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात झाल्याची दुर्दवी बातमी समोर आली आहे. पारोळा येथून तीन किमी अंतर असलेल्या वीचखेडा गावाजवळ घडली हा अपघात दि.26 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास गॅस टँकर व मारुती स्विफ्ट यांच्यात अपघात झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेत दोन मित्र जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे.
मिळालेली माहिती अशी कि, मुंबईहून पारोळा येत असताना वीचखेडे गावानजीक आशिया महामार्गावर सकाळी सात वाजेच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने येणारे टॅंकरने मारुती स्विफ्टला जोरदार धडक दिल्याने यात पारोळा नगरपालिकेचा अभियंता कुणाल सौपुरे (वय ३५) रा गोंधळ वाडा, पारोळा व एम एस अर्थो स्पेशलिस्ट डॉ.निलेश मंगळे (वय ३५) रा डी डी नगर, पारोळा यांचा जागीच मृत्यू झाला तर बसवाहक संदीप पवार (वय ३७) रा आर एल नगर, पारोळा हा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. तर कुणाल सौपूरे यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, व दोन वर्षाची लहान मुलगी आहे. डॉ.निलेश मंगळे हा उत्तराखंड येथे एम एस अर्थो स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणून कार्यरत होता त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भावंडे, पत्नी व दोन महिन्याचे जुळे दोन मुले आहेत. तर संदीप पवार हा जखमी झाला आहे. घटनास्थळी पारोळा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले होते.




















