जळगाव मिरर | १८ नोव्हेबर २०२३
जळगाव – पाचोरा रस्त्यावर दि.१७ रोजी रात्रीच्या सुमारास जळगावहून शिरसोली येथे दुचाकीने जात असलेल्या तीन तरूणांना भरधाव वेगात असलेल्या चारचाकीने धडक दिली असून यात दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातून शिरसोली गावी तीन विद्यार्थी एमएच-१९ सीएन ९१२७ क्रमांकाच्या दुचाकीवरून रात्री दहा वाजेच्या सुमारास जात असतांना जैन इरिगेशनच्या जवळ एमएच१९ सीयू ८०९३ क्रमांकाच्या भरधाव वेगाने जळगावकडून शिरसोलीकडे जाणार्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात येथील पियुष ताडे, किशोर काटोले आणि रोहित ताडे यांचा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत या तिन्ही विद्यार्थ्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. यातील रोहित ताडे आणि किशोर काटोले या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.