
जळगाव मिरर । १५ डिसेंबर २०२२
जळगाव सुरा बाळगून दहशत माजविणाऱ्या गुरुजीतसिंग सुजाणसिंग बावरी रा. (22,सद्गुरूनगर) याला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास शिरसोली नाका परिसरातून अटक केली. त्याच्याजवळून सुरा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास गुरुजीतसिंग बावरी हा शिरसोली नाका भागात कमरेला सुरा लावून दहशत माजवत होता. ही माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी त्याला अटक केली. त्याच्याजवळून सुरा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल राहुल रगडे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, अल्ताफ पठाण, गणेश शिरसाळे, सचिन पाटील, विकास सातदिवे, किशोर पाटील, छगन तायडे, मुकेश पाटील, विशाल कोळी यांनी केली आहे.




















