मुंबई : वृत्तसंस्था
ज्या वेळेची अवघा महाराष्ट्र वाट बघत होता ती वेळ उद्यावर येऊन ठेपली आहे. उद्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मुंबईची राजकीय युध्दभुमी होऊ पाहतेय. सेनेच्या दोन्ही गटात शाब्दिक वस्त्रहरण रंगणार आहे. दसरा मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाने अभूतपूर्व असं नियोजन करतेय. दोन्ही गट लाखो कार्यकर्ते जमवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केलाय. १० हजारांहून अधिक एसटी बसेस व खासगी बसेस, गाड्या बुक करण्यात आल्या आहेत. त्यातून लाखो कार्यकर्ते दोन्ही मेळाव्यांसाठी जमवले जात आहेत. दोन्ही गट आपले शक्तिप्रदर्शन उद्या करणार आहे.
मुंबईत दसऱ्याला सुट्टी असल्याने इतर वाहनांची संख्या कमी असेल असं गृहीत धरून लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रातून मुंबईत आणण्याचं नियोजन आहे. एवढी मोठी गर्दी आवरण्याचं आणि त्याचवेळी कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोरआहे. शिवसेनेतून फूटल्यानंतर शिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे या दसऱ्या मेळाव्यासाठी शिंदे गटाने मेगाप्लान आखलाय.
शिंदे गटाचा मोठा प्लॅन
दसऱ्या मेळाव्यासाठी शिंदे गटाने मोठा प्लॅन आखला आहे. या मेळाव्यात ५१ फुटी तलवारीचं पूजन होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यात तलवारीचं शस्त्रपूजन होईल. तसंच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांना १२ फूटी चांदीची तलवार भेट देण्यात येणार आहे. गर्दी लक्षात घेऊन बीकेसी मैदानात १०० एलईडी स्क्रीन लावले जाणार आहेत.
बाळासाहेबांच्या भाषणांचे व्हिडिओ लागणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचे जुने व्हिडिओ या मंचावर दाखवल जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान हे व्हिडिओ दाखवले जाणार आहेत. बीकेसीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लिफ्टमधून स्टेजवर एन्ट्री करणार आहेत. हायड्रोलिक प्रकारची ही लिफ्ट आहे. व्यासपिठावर मेळाव्यासाठी ४०० बाय १२०० फूटांचा मंचही तयार करण्यात आला आहे.
पोलिसांची कडकोट सुरक्षा
बीकेसी मैदानावर तीन हजार मुंबई पोलिसांचा ताफा दाखल झालाय. विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बीकेसी मैदानावरील सुरक्षेचा आढावा घेतला. मेळाव्यावेळी मोबाईल न वापरण्याचे निर्देश नांगरे पाटलांनी पोलिसांना दिलेत. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाटी दोन ते तीन लाख येणार असल्याची शक्यता शिंदे गटाने व्यक्त केली आहे. या लोकांच्या खाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांसाठी पाच लाख वडापाव आणि फूड पॅकेट्सची सोय करण्यात येणार आहे.