
जळगाव मिरर / १३ मार्च २०२३ ।
सध्या देशभर अनेक ठिकाणी लग्नसराई सुरु आहे यात बॉलिवूड देखील मागे नाही. नुकतंच अभिनेत्री स्वरा भास्करचं कोर्ट मॅरेज झालं. त्यानंतर आता ती साग्रसंगीत लग्न करतेय. नुकतीच तिची हळद पार पडली.
स्वराच्या हळदीचे फोटो व्हायरल होत असताना दुसरीकडे टेलिव्हिजन अभिनेत्री कृष्णा मुखर्जीच्या मेहंदी आणि हळदीचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. “ये हैं मोहब्बते” या प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकेतील अभिनेत्री कृष्णा मुखर्जीला मेहंदी आणि हळद लागली. बॉयफ्रेंड चिराग बाटलीवालाबरोबर ती लग्नबंधनात अडकणार आहे. दरम्यान अभिनेत्रीवर नेटकऱ्यांनी सणकून टीका केली आहे.
कृष्णाचा मेहंदी सोहळ्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे. अभिनेत्री कृष्णा मुखर्जी आणि चिराग बाटलीवाला यांच्या लग्नासाठी अली गोनी, जस्मिन भसीन, शिरीन मिर्जा सारख्या कलाकारांनी हजेरी लावली. मेहंदी आणि हळदीच्या सोहळ्यात दोघांनी दणकून डान्स केलाय. दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय. दरम्यान कृष्णाच्या हाताला मेंहदी लावत असतानाच तिच्या व्हिडीओनं नेटकऱ्यांच्या डोळ्यात तिडीक गेली आहे. कृष्णाच्या मेहंदीसाठी सासर आणि माहेरची सगळी मंडळी जमली होती. मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीमध्ये कृष्णाचा मेहंदी सोहळा सुरू झाला. कृष्णानं मेहंदीसाठी खास हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता.
ती सुंदर सजली होती. एकीकडे हाताला मेहंदी लावत असताना दुसरीकडे कृष्णा हुंका मारताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कृष्णाला कोणीतरी हुंका आणून देतं. ती देखील मोठ्या उत्साहात हुक्का घेऊन तोंडातून धूर सोडताना दिसत आहे.