
भुसावळ : प्रतिनिधी
तालुकयातील नशिराबाद जवळच असलेल्या भादली गावातील २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळ असलेल्या शेतात बुधवारी सकाळी आढळल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, भादली येथील संकेत लिलाधर आढाळे (२८ ) असे मयत तरुणाचे नाव आहे.संकेत आढाळे या तरुणाचा कडगाव रस्त्यावर पाटचारीजवळ लागून असलेल्या शेतात मृतदेह आढळला आहे. तरुणाच्या डोक्यावर ईजा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या तरुणाचा खून झाल्याचा प्राथमिक संशय आहे मात्र शवविच्छेदन अहवालातून तरुणाच्या मृत्यूचे स्पष्ट कारण समोर येणार आहे.
तरुणाचा मृतदेह शेतात असल्याची माहिती कळताच नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, एएसआय अलियार खान, समाधान पाटील, किरण बाविस्कर, संजय बाळू पाटील आदींनी धाव घेतली.






















