जळगाव मिरर | २ जानेवारी २०२५
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना उघडकीस येत असतांना नुकतेच नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इंजिनिअरिंगमध्ये वारंवार नापास होत असल्यामुळे जाब विचारणाऱ्या आई-वडिलांचा मनात राग धरुन बसलेल्या मुलाने खून केला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उघडकीस आलेल्या या घटनेने नागपूर हादरून गेले. कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे दुहेरी हत्याकांड घडले. लीलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे अशी मृत दांपत्याची नावे आहेत. आरोपी उत्कर्ष तर उत्कर्ष लीलाधर डाखोळे (२४, खसाळा, कपिलनगर) असे आरोपी मुलाचे नाव असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. दरम्यान, उत्कर्षला एमडी ड्रग्जचे व्यसन होते त्यामुळे त्याचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीलाधर डाखोळे हे कोराडी वीज केंद्रात टेक्निशियन पदावर नोकरीवर होते तर पत्नी अरुणा डाखोळे या संगीता विद्यालयात शिक्षिका होत्या. त्यांना मुलगा उत्कर्ष (२४) आणि मुलगी सेजल (२१) अशी दोन मुले आहे. उतकरष हा इंजिनिअरिंगचया तिसरया वरषाला तर मुलगी बीएएमएसचया परथम वरषाला शिकते. उतकरष हा गेलया दोन वरषांपासून वारंवार नापास होत होता. तयामुळे आईने तयाला बैलवाडयाला असलेली तयांची शेती कसणयाचा उपरोधिक सलला दिला होता. तर वडील लीलाधर यांनीही उतकरषला इंजिनिअरिंग झेपत नसेल तर आयटीआय किंवा पॉलिटेकनिकला परवेश घेणयाचा सलला दिला होता. २५ डिसेंबरला वडिलांनी उतकरषला मारहाण करतानाच शिकषण सोडून शेतीवर जाणयास सांगितले. आईनेही तयाची बॅग भरून ठेवली होती. शिवाय इंजिनिअरिंग सोडून पॉलिटेकनिकला परवेश घयावा लागेल, असे वाटत असलयाने तो असवसथ होता.
आईवडील शेती करण्यासाठी पाठवत असल्याने उत्कर्ष अस्वस्थ होता. त्यामुळे त्याने आईवडिलांनाच संपवण्याचा कट रचला. २६ डिसेंबरला विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यात आई व्यग्र होती. उत्कर्षने आईचा दोन्ही हातांनी गळा आवळून खून केला. त्यानंतर तो आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. तासाभराने त्याचे वडील घरी आले. त्यांना पत्नी मृत झाल्याचे पाहून धक्काच बसला. ते सोफ्यावर बसलेले असताना उत्कर्षने मागून येऊन त्यांच्या मानेवर चाकूने वार केले. त्यातच त्यांचाही मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह घरात ठेवून उत्कर्ष घर कुलूपबंद करून पसार झाला.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लीलाधर यांना शुभेच्छा देण्यासाठी एक मित्र घरी आला. त्याला घरातून दुर्गंधी आली. त्याने शेजाऱ्यांसह ठाणेदार महेश आंधळे यांनाही माहिती दिली. पोलिसांनी दार तोडून घरात प्रवेश केला. त्यांना अरुणा आणि लीलाधर यांचे मृतदेह दिसले. मुलगा आणि मुलीबाबत चौकशी केली असता दोघेही बोखारा येथे काकांकडे गेल्याची माहिती मिळाली. दोन्ही भावंडांना पोलिसांनी घरी आणून चौकशी केली असता उत्कर्षच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.