जळगाव मिरर | २३ जानेवारी २०२५
मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव फाट्यावर कंटेनरने चिरडल्याने पिंप्रीपंचम येथील माजी सरपंच रघुनाथ पाटील ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातून मुक्ताईनगरकडे भरधाव जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्रीपंचम येथील माजी सरपंच रघुनाथ नाना पाटील (वय ७०) यांचा जागीच मृत्यू झाला. मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या महामार्गावर नायगाव फाट्याजवळील उड्डाणपूल परिसरात मंगळवारी सकाळी ११ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, पिंपरीपंचम येथील माजी सरपंच रघुनाथ पाटील हे टीव्हीएस कंपनीच्या दुचाकी (एमएच १९, बीएफ ६८३) ने मुक्ताईनगरकडे जात होते. नायगाव फाट्याजवळील उड्डाण पुलाजवळ मध्य प्रदेशकडून मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या ट्रक कंटेनर (एचआर- ३८, एडी ५१०९) ने त्यांच्या दुचाकीला मागाहून धडक दिली. या अपघातात कंटेनरचे चाक रघुनाथ पाटील यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी भगवान तुकाराम चौधरी यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात कंटेनर चालक विजय महेश्वर बैठक (रा. लखनीत पुरमेसपट्टी, ता. उजियारपूर, जि. समस्तीपूर, बिहार) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा तपास हवालदार लीलाधर भोई करत आहेत.