
जळगाव मिरर । ८ डिसेंबर २०२२
शहरातील नवीन बस स्थानकाच्या शेजारी असलेले संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्र येथे बेघर असेलल्या आजी आजोबासोबत महिला सामाजिक कार्यकर्त नेहा संतोष जगताप यांचा विवाहाचा वाढदिवस त्यांनी या आजी-आजोबासोबत साजरा करून एक कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे.
नेहमीच आपला वाढदिवस आपण आपल्या मित्र परिवार व नातेवांईकासोबत करीत असतो पण आपल्या परिसरातील असे अनेक बेघर वृद्ध आहेत त्यांना एका वेळचे जेवण सुद्धा खूप महाग झाले आहे, त्याचाच प्रत्यत जगताप दाम्पत्यांना नेहमी येत होता, त्यांनी दि ८ रोजी आपल्या विवाहाच्या वाढदिवसानिमित हा स्तुत्य उपक्रम आपल्या हातून घडवून आणला. या ठिकाणी असलेल्या प्रत्येक आजी आजोबांना पोटभरून जेवण देवून त्यांनी वाढदिवस साजरा केला.
या प्रसंगी नारीशक्ती अध्यक्ष मनीषा पाटील, नूतन खेडकर, मरियम भुगडवाला, संगीता चौधरी, कुसुमताई बिरारी, जळगाव शहर हितवर्धक संस्था अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप, अनिल खैरनार, शैलेंद्र सोनवणे तसेच बेघर निवारा केंद्र संचालक मनोज कुलकर्णी व त्यांचे सहकारी यांचे उपस्थिती लाभली होती.



















