जळगाव मिरर | ६ डिसेंबर २०२५
जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीची लवकरच रणधुमाळी सुरू होणार आहे त्यापूर्वीच आता जळगाव शहरातील तरुण उमेदवारांनी आतापासून आपले काम सुरू केले आहे त्यामुळे यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत तरुण उमेदवार मैदानात उतरणार आहे . यात मनसेचे देखील अनेक तरुण उमेदवार मनपात आपले नशीब आजमविणार आहे.
जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश चंद्रकांत पाटील यांनी यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत सातत्याने विविध आंदोलन उपोषणाच्या माध्यमातून अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे त्यामुळे त्यांनी यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग 11 मधून आपले नशीब आजमविणार आहे त्यामुळे त्यांनी आतापासूनच काम सुरू केले आहे. परिसरातील नागरिकांकडून देखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
योगेश चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत जळगाव जिल्हाध्यक्षपदावर असून शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे कार्य आहे त्यामुळेच त्यांनी यंदा जळगाव महानगरपालिकेत मनसे कडून निवडणूक लढणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे.





















