जळगाव मिरर । ११ ऑगस्ट २०२३
जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याची घटना राज्यभर ताजी असताना पारोळा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलगी हि १० रोजी सायंकाळी शौचालयाला जात असताना संशयित आरोपी अशोक मगा भिल पारोळा याने तिला अडवून तिच्यावर जबरदस्ती करून मुलीने विरोध केला असता आरोपीने तिचा दोरीने गेला आवळून आणि डोक्यावर दगडाने मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली . तिला उपचारासाठी तिच्या भावाने धुळे येथे एका रुग्णालयात दाखल केले असून पीडितेवर उपचार सुरु आहे. याप्रकरणी पीडितेच्या भावाने पारोळा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून आरोपी बारक्या उर्फ अशोक मगा भिल (मोरे ) याच्याविरुद्ध ३०७,३७६(३) , ३५४,३२३,व बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा कलाम ४,८,१०,१२ प्रमाणे पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्य्क फौजदार सुनील पवार करीत आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
