जळगाव मिरर | २९ जुलै २०२३
लग्न झाल्यावर अनेक पती-पत्नी एकत्रित राहून आपला संसार उत्तमरीत्या करीत असतात तर काहींच्या संसारात मोठ्या अडचणीत येत असतात असेच एक प्रकरण जळगाव शहरातील महिलेसोबत घडले आहे. महिलेने फारकत घेतलेल्या पतीने माझ्यासोबत का राहत नाही, असा जाब विचारत पत्नीचा विनयभंग केल्याची घटना २६ जुलै रोजी रात्री महाबळ चौकात घडली. यासंदर्भात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक ३१ वर्षीय महिला २६ रोजी रस्त्याने जात असताना तिला एका जणाने अडवून तू माझ्या सोबत का राहत नाही असे विचारत शिवीगाळ केली. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी दिली. महिला घरी गेल्या नंतर तेथे जाऊन या व्यक्तीने मारहाण केली व तुला जिवंत सोडणार नाही, तू एकटी का राहते, असे विचारत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल केला आहे.