जळगाव मिरर / २२ मार्च २०२३ ।
प्रत्येक परिवाराचे स्वप्न असते कि आपल्या घराबाहेर देखील मोठी चारचाकी असावी पण देशात वाढत्या महागाईमुळे अनेकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कित्येक वर्ष निघून जातात पण स्वप्ने पूर्ण होत नाही पण अशा वेळी अनेक बँकेने ऑफर देत ग्राहकांचे स्वप्न पुर्णत्वाकडे आणत आहेत. त्यासाठी अनेक बँक आता उत्तम लोन ऑफर देत आहेत. त्यामुळे तुमच्या स्वप्नातील चारचाकी लागलीच घरी आणू शकतात.
आजकाल बँका देखील ग्राहकांना अगदी मोजक्या कागदपत्रांवर कार लोन ऑफर करतात. गेल्या काही महिन्यांपासून रेपो रेटमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने कार लोनवरील व्याजदरात सातत्याने वाढ होतेय. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला अशा पाच बँकांची माहिती देत आहोत ज्या ग्राहकांना कमी व्याजदर आणि प्रोसेसिंग फीसमध्ये कार लोन देत आहेत.
बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना 8.70 टक्के व्याजदराने कार लोन देतेय. 1 कोटीच्या कर्जावर बँक 0 प्रोसेसिंग फीस आकारत आहे. कॅनरा बँक आपल्या ग्राहकांना 9.15 टक्के सुरुवातीच्या दराने कार लोन ऑफर करतेय. यामध्ये ग्राहकांना कार लोनवर प्रोसेसिंग फी म्हणून 1,000 ते 5,000 रुपये भरावे लागतील. अॅक्सिस बँक आपल्या ग्राहकांना 8.55 टक्के दराने कार लोन देत आहे. कर्जावर प्रोसेसिंग फीस म्हणून ग्राहकांना किमान 3,500 ते 7,000 रुपये भरावे लागतील.
खाजगी क्षेत्रातील बँक फेडरल बँक 11 टक्के दराने कार लोन देत आहे. हे लोन पूर्ण 84 महिन्यांसाठी घेतले जाऊ शकते. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच SBI आपल्या ग्राहकांना 8.60 टक्के दराने कार लोन देत आहे. या कर्जावर बँक ग्राहकांकडून 0 प्रोसेसिंग फीस आकारत आहे. bankbazaar.com वर ही सर्व माहिती देण्यात आली आहे.
