जळगाव मिरर | १४ डिसेंबर २०२३
राज्यातील लाखो तरुण पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहत आहे त्या तरुणासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. राज्यात हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून महाराष्ट्र पोलीस दलात मेगा भरती होणार असल्याची घोषणा आज गृहमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात केली आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भरती नवीन आकृतीबंध तयार केल्यामुळे होणार आहे. विधान परिषदेत सतेज पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. नवीन आकृतीबंधामुळे आता 23 हजार 628 पोलिस शिपाई पदे भरली जाणार आहे. वाढत्या लोकसंख्यानुसार ही भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या ७० वर्षांत आकृतीबंध झाला नव्हता.
जून महिन्यात राज्याचा आकृतीबंद करण्यात आला. यामुळे राज्यात पोलिसांची संख्या किती आहे आणि किती भरण्याची गरज आहे, त्याची माहिती मिळाली, असे सतेज पाटील यांनी म्हटले. त्यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंध नुसार पदभरती केली जात होती. पोलीस दलात भरतीची प्रक्रिया सुरु आहे. परंतु नवीन आकृतीबंधानुसार जागा वाढल्या आहे. यामुळे नवीन आकृतीबंधानुसार पोलीस भरती होणार आहे. यासाठी गृहमंत्रालयाने निधी उपलब्ध करून दिला आहे.