
जळगाव मिरर । १६ नोव्हेबर २०२२
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडीकडून चौकशी सुरू होती. सर्व तपासातून ड्रायव्हर दोषी असल्याचे समोर आले आहे. कारचालक एकनाथ कदमविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांचा ड्रायव्हर एकनाथ कदम याला अटक करण्यात आली आहे.
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडीकडून चौकशी सुरू होती. चौकशीत विनायक मेटेंची गाडी ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. याशिवाय तज्ज्ञांची एक समिती तयार करून त्यांच्याकडूनही याप्रकरणी मते घेतली गेली. या समितीत आयआरबीचे अभियंता आणि इतरांचा समावेश होता.
दरम्यान हा अपघात चालकाने अतिवेगाने गाडी चालवल्यामुळे तसेच वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे झाल्याचे समोर आले. यामुळे चालक एकनाथ कदमविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांचा ड्रायव्हर एकनाथ कदम याला अटक करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी (१४ ऑगस्ट) मुंबई-पुणे महामार्गावर कार अपघातात विनायक मेटे यांचा मृत्यू झाला होता.





















