जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२५
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वाळूमाफिया मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहे. तर भडगाव येथे तीन दिवसांपूर्वी डंपरने ३ म्हशींना चिरडले होते. या अपघातात तिन्ही म्हशी जागेवरच ठार झाल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच त्याच चालकाने भडगाव पेठ चौफुलीवर आणखी एकाला उडवल्याचा प्रकार उघडकीस आला असून अद्यापही चालक मोकाटच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका डंपरने काही दिवसांपूर्वी तीन म्हशींना चिरडले होते. या अपघातात तिन्ही म्हशी जागीच ठार झाल्या होत्या. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी नाना हाडपे हे बुधवारी दुपारी १२:३० वाजेदरम्यान आपल्या शेतात जात असताना भडगाव पेठ चौफुली येथे त्यांच्या गाडीवर डाव्या बाजूने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीने त्यांना धडक दिली. ही गाडीदेखील डंपरचालकच चालवत असल्याचे दिसून आले. घटनेनंतर हा चालक पुन्हा पसार झाला. हडपे यांना परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती आता सुधारत असून दोन अपघात केल्यानंतर चालक मात्र अजूनही मोकाटच आहे.