जळगाव मिरर | २३ नोव्हेबर २०२३
खान्देशातील धुळे शहरात एका तरुणीची हत्या झाल्याची घटना ताजी असतांना रात्रीच्या सुमारास एका तरुणाचा देखील मृतदेह आढळून आला आहे. एकाच रात्री या दोन घटना एकाच परिसरात घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्री तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर त्याच परिसरामध्ये आज पहाटेच्या सुमारास तरुणाचा देखील मृतदेह आढळून आला. या तरुणाच्या मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटली देखील पोलिसांना आढळून आली आहे. त्यामुळे रात्री झालेल्या तरुणीच्या हत्येप्रकरणात तरुणाचा देखील काही संबंध आहे का? या संदर्भात आता तर्कवितर्क लडविले जात आहेत. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपस सुरु आहे.
पोलीस प्रशासनातर्फे डॉग पथकासह इतर तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मृतदेहाचा पंचनामा करून पोलीस प्रशासनातर्फे या दोन्ही तरुण-तरुणीच्या मृत्यू प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याचबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे हा तपास केला जात असून, एकाच रात्री या दोन घटना एकाच परिसरात घडल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.