जळगाव मिरर । १० डिसेंबर २०२२
राज्यात गेल्या काही दिवसापासून भाजप नेते व राज्यपाल कोश्यारी हे सातत्याने बेताल वक्तव करीत असल्याबाबत आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारयांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले कि, सत्ताधाऱ्याच्या डोक्यात मस्ती गेली आहे, म्हणून सरकारमधील नेते अशी बेताल वक्तव्य करत आहे, मविआच्या काळात एकही प्रकल्प गेला नाही, आताच गेले खमकेपणाणे राज्यासाठी काम केले तर राज्याचा विकास होतो असेही अजित पवारांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सांगितले पाहिजे की असे वक्तव्य करु नये. माझ्याकडून एकदाच चुकीने वक्तव्य झाले ते नको व्हायला हवे होते, पण त्यानंतर माझ्याकडून चुकीचे वक्तव्य झाले नाही, पण राज्यात रोजच नवे वादग्रस्त वक्तव्य केले जात आहे असा आरोपही अजित पवारांनी केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, राज्य सरकारने कर्नाटक सरकारला ठणकावून सांगायला हवे की एक इंचही जागा देणार नाही, मात्र सरकार या प्रकरणी काहीच बोलताना दिसून येत नाहीये, अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली आहे. राज्यातील वीज वितरण खाजगी करण्याचा डाव राज्यकर्त्यांनी आखला आहे, असा आरोपही अजित पवार यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, राज्यात रोजच सत्ताधारी नेते वादग्रस्त वक्तव्य करत आहे. याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी. रोजच अशी वक्तव्य केली जात आहे, तरीदेखील यावर काहीच बोलले जात नाही, मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष घालत, नेत्यांनी अशी वक्तव्य करु नये, अशी ताकीद दिली पाहिजे असेही पवारांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, गायरान जमीनीचा प्रश्न निर्माण सुरू आहे. राहत्या घरापुरती जागा मिळावी हरा प्रत्येकाचा हक्क आहे, असेही अजित पवारांनी म्हटले आहे. तर विरोधकांनी खोट्या केस पुढे करत अडकविण्यात येत असल्शचा आरोपही अजित पवारांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांना खोट्या केसमध्ये अडकविण्याचा प्रयत्न झाला, तर दुसरीकडे संजय राऊत यांना अटक केली. त्यावर कोर्ट म्हणाले की ही अटकच चुकीची आहे असेही अजित पवारांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, आम्ही सत्तेत होतो पण कधीच विरोधकांना असा त्रास दिला नाही असेही पवारांनी म्हटले आहे. आमच्या जवळच्या माणूस चुकला तर आम्ही कारवाई केली असेही अजित पवारांनी म्हटले आहे. यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. तरी एसटी महामंडळाच्या लोकांनी मविआच्या काळात आंदोलन केले. आता तुमचे सरकार आले आहे, आता का एसटीच्या कर्मचाऱ्यांना सरकारमध्ये घेतले नाही, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.
