जळगाव मिरर / २७ एप्रिल २०२३ ।
बॉलीवूड क्षेत्रातील अनेक अभिनेत्यांच्या सत्य घटना व्हायरल होत असतात अशीच एका अभिनेत्याची घटना समोर आली आहे. या अभिनेत्याने चक्क मुंबईत एकेकाळी भिक मागून आपला उदरनिर्वाह केला आहे. ते अभिनेते म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतील कॉमेडीचा बादशाह म्हणजेच अभिनेते कादर खान. अभिनयासह संवादलेखनातही त्यांनी आपला ठसा उमटवला. पण आजही त्यांच्या अनेक आठवणी जिवंत आहेत.
कादर खान आज आपल्यात नसले तरी, त्यांचे अनेक डायलॉग जगण्यासाठी नवी उमेद देतात. कादर खान यांच्या आयुष्यातील अनेक किस्से आजही तुफान चर्चेत असतात. कादर खान यांचा जन्म अफगानिस्तान याठिकाणी झाला होता. पण कादर खान जेव्हा लहान होते, तेव्हा त्यांचं कुटुंब मुंबई येथील धारावी याठिकाणी आलं. कादर खान यांचं लाहनपण प्रचंड हालाखीचं होतं. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कादर खान यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.
कादर खान जेव्हा लहान होते, तेव्हाच त्यांचे आई – वडील विभक्त झाले. अशा परिस्थितीत अभिनेत्याचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. कादर खान यांनी कुटुंबाची भूक भागवण्यासाठी भीक मागण्याची सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलेल्या कादर खान यांचं बालपण संघर्षमय होतं. आज कादर खान यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेवू.
मीडिया रिपोर्टनुसार, आई – वडील विभक्त झाल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी कादर खान यांच्या खांद्यावर आली. कुटुंबाची भूक भागवण्यासाठी कादर खान भीक मागायचे. कादर खान एका मशिदीसमोर मागचे आणि त्यातून मिळालेल्या रुपयांमधून कुटुंबाची भूक भागवायचे. त्यानंतर कादर खान यांच्या आईने त्यांना शिक्षणासाठी प्रेरित केलं. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी कादर खान यांनी मुंबईतील इस्माईल युसूफ कॉलेजमधून पदवी आणि नंतर सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. कादर खान अभ्यासात फार हुशार होते. शिक्षणासोबतच त्यांनी थिएटरशीही देखील नातं जोडलं. थिएटरमुळेच कादर खान यांना नवीन ओळख मिळाली. कादर खान यांची अभिनयाप्रती असलेली ओढ त्यांना चित्रपटांमध्ये घेऊन आली होती. त्यानंतर कादर खान यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. कादर खान यांनी कायम त्यांच्या अभिनयाने चाहत्यांचं मनोरंज केलं.
एकदा दिलीप कुमार यांनी कादर खान यांचं नाटक पाहण्याची इच्छा व्यक्त केली. कादर खान यांचं नाटक पाहून दिलीप कुमार यांनी त्यांना दोन सिनेमांची ऑफर दिली. १९७३ मध्ये यश चोप्रा यांच्या ‘दाग’ या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या कादर खान यांनी त्यांच्या करिअरमध्ये ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं होतं, तर त्यांनी जवळपास २५० सिनेमांमध्ये डायलॉग लिहिले होते. कादर खान यांचे 2018 मध्ये निधन झाले. कादर खान यांच्या निधनामुळे चाहते आणि बॉलिवूडला मोठा धक्का बसला…
